परभणी- मराठवाड्यातील क्रिकेटपटुंमध्ये खेळाडुंमध्ये मोठी गुणवत्ता आहे. मात्र त्यांना हवा तसा वाव मिळत नाही. त्यामुळे मराठवाड्यातील चांगल्या क्रिकेटपटुंनाही संधी मिळावी यासाठी स्वतंत्र रणजी संघाची आवश्यकता आहे. मराठवाड्यालाही रणजीचा दर्जा मिळावा यासाठी आपण शरद पवार यांच्या माध्यमातून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे आग्रह धरणार असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले.
परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे आयोजित मराठवाडा
पातळीवरील विभागीय क्रिकेट स्पर्धेचे (पाथरी प्रिमियर लिग) चे उदघाटन मुंडे
यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.८) संध्याकाळी झाले. त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादी
काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या स्पर्धेच्या
उदघाटन कार्यक्रमास बाबाजाणी दर्राणी, विजयकुमार भांबळे, आ.डॉ.मधुसुदन
केंद्रे, राजेश विटेकर, माजी खासदार सुरेश जाधव, माजी आ.नखाते, युवक नेते अजय
मुंडे, परभणी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, संयोजक जुनैद
दुर्राणी उपस्थित होते. यावेळी मुंडे यांनी काही वेळ फलंदाजी करून या स्पर्धेचे
उदघाटन केले.
राजकारणातही कबड्डीचा खेळ सुरू असतो, मात्र या खेळाप्रमाणे आपल्याला पाय खेचाखेची
राजकारणात आपल्याला कधीच जमली नाही. आपण नेहमीच सरळ राजकारण करतो अशी मिश्कील टिपणीही
त्यांनी केली.
















